Weekly Horoscope

२६ ऑगस्ट २०१९ - ०१ सप्टेंबर २०१९

मेष

Mesh

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकणे आपल्या हिताचे होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती एखादा लहानसा प्रवास करू शकतील. ह्या आठवड्यात कामे सहजपणे होणार नसल्याने आपणास त्यासाठी अधिक श्रम करावे लागतील.

वृषभ

vrishabh

हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा उत्तम आहे. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. आपण व्यवसाय वृद्धीचा विचार करू शकाल. नवीन कामाची सुरवात करण्यास हा आठवडा अनुकूल आहे. जमीन – जुमल्याशी संबंधित कामात सावध राहण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे.

मिथुन

mithun

हा आठवडा आपणास अनुकूल फले मिळवून देणारा आहे. आपणास नवीन काम करण्याची प्रेरणा होईल. कार्यात यशस्वी व्हाल, मात्र महत्वाचे एखादे काम करताना निर्णय घेणे आपणास जमणार नाही. एखाद्या सरकारी योजनेतून आपणास धनलाभ होण्याची शक्यता आहे. जमीन – जुमल्याशी संबंधित कागदपत्राची देवाण – घेवाण करताना सावध राहावे. आपली जीवनशैली वैभवाकडे नेणारी होईल.

कर्क

kark

आठवड्याची सुरवात जरी चांगली झाली नाही तरी उत्तरार्ध अपेक्षेनुसार चांगला होईल. प्रत्येक बाबतीत आपला दृष्टिकोन सकारात्मक असावयास हवा. खर्चात वाढ झाल्याने आर्थिक चणचण जाणवेल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद – विवाद करणे शक्यतो टाळावे. विरोधक आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आपले म्हणणे ऐकून घेणार नाहीत. एखाद्या अनावश्यक खर्चाने आपण त्रासून जाल.

सिंह

sinha

हा आठवडा आपणास अनुकूलतेचा आहे. प्राप्तीची नवीन साधने उपलब्ध होतील. भिन्नलिंगी मित्रांपासून काही लाभ होण्याची शक्यता आहे. भावंडे व मित्रांकडून सुद्धा काही लाभ होण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात आर्थिक देवाण – घेवाण करताना सावध राहण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. दलाली, कमिशन किंवा व्याजाच्या कामात सावध राहावे लागेल. व्यापारात नुकसान संभवते. चित्रपट बघण्यात , खरेदी करण्यात पैसा खर्च होईल.

कन्या

kanya

आठवड्याची सुरवात जरी चांगली झाली तरी उत्तरार्धात काही त्रास होण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात नोकरी – व्यवसाय व व्यापारात आपले वर्चस्व राहील. घरी वडीलधारी व कार्यस्थळी वरिष्ठांचे अपेक्षित सहकार्य सुद्धा आपणास मिळेल. कोणत्याही कामास कमी लेखल्यास आपलेच नुकसान होईल. मनातून नकारात्मक विचार काढून टाकल्यासच आपणास यशस्वी होता येईल. महिला नवीन वस्त्र व आभूषण खरेदीत स्वारस्य दाखवू शकतील. रचनात्मक व कलात्मक प्रवृतींकडे आपले लक्ष राहील.

तूळ

tula

ह्या आठवड्यात आपणास संयमाने कामे करावी लागतील. ह्या आठवड्यात आपण काहीसे विचलित व्हाल, मात्र ह्या दरम्यान आपणास एखादा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या अनावश्यक कार्यात पैसे खर्च झाल्याने आर्थिक नुकसान होऊ शकेल. नवीन उद्दिष्टाच्या निर्धाराने आपण काहीसे चिंतीत व्हाल. स्वतःच्या कामात व्यस्त राहाल. उत्तरार्धात आपण वेळेचा सदुपयोग करू शकाल व विस्कळीत झालेली कामे सुरळीत करण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. ह्या पूर्ण आठवड्यात आपणास आपल्या वाणीवर संयम ठेवावा लागेल.

वृश्चिक

vrishchik

हा आठवडा आपणास मिश्र फलदायी ठरणारा आहे. ह्या आठवड्यात नवीन कामाची सुरवात करण्या अगोदर त्यावर गंभीरतापुर्वक विचार करावा लागेल. कार्यस्थळीचे वातावरण आपणास अनुकूल राहील. स्पर्धेत यशस्वी होऊ शकाल. दैनंदिन कामात मात्र विलंब होताना दिसून येईल. परदेशातून एखादी चांगली बातमी मिळेल. उत्तरार्धात नोकरीत काही त्रास होऊ शकतो. वरिष्ठांशी वाद न घालणे आपल्या हिताचे होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल.

धनु

dhanu

हा आठवडा एकंदरीत आपणास चांगला जाईल. विधायक कार्याकडे आपले लक्ष लागेल. वैचारिक ठामपणा राहील. आपण सर्व कामे तन्मयतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर काहीसे नाराज होतील. व्यापार – व्यवसायातील स्थितीत सुधारणा होईल. व्यापारी आपला व्यापार वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहतील. सरकारी कामात त्रास संभवतो. आठवड्याच्या मध्यास वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाने त्रासमुक्त होण्यात आपण यशस्वी होऊ शकाल. प्राप्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्नी व संततीच्या सहकार्याने केलेल्या एखाद्या कामात लाभ होऊ शकेल.

मकर

makar

हा आठवडा आपणास मध्यम फलदायी आहे. एखाद्या कामाच्या बाबतीत जर आपण साशंक असाल तर ते टाळणे हितावह होईल. खर्चात वाढ झाल्याने आपली उदासीनता वाढेल. एखाद्या व्यक्तीशी विना कारण वाद होण्याची शक्यता आहे. आपणास आर्थिक देवाण – घेवाणीत सावध राहावे लागेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांशी वाद झाल्याचा त्रास होऊ शकतो. शेअर्स – सट्ट्यात व जमीन – जुमल्याशी संबंधित कामात सावध राहावे लागेल. ह्या आठवड्यात यशस्वी होण्यासाठी आपणास अधिक कष्ट करावे लागतील. मात्र, आठवड्याचे शेवटचे दोन दिवस आपणास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना हा आठवडा तणावाचा आहे.

कुंभ

kumbh

हा आठवडा आपल्यासाठी अंशतः चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस काही त्रास होईल, मात्र उत्तरार्धात परिस्थितीत सुधारणा होईल. अचानकपणे उत्साहित व्हाल. कामाची गोडी निर्माण झाल्याने आपण व्यवसाय वृद्धीचा प्रयत्न करू शकाल. नोकरीत सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. वरिष्ठांची कृपा झाल्याने आपणास प्रसन्नता जाणवेल. ह्या दरम्यान आपण विरोधकांवर मात करू शकाल. मात्र, उत्तरार्धात नोकरीत काही त्रास होऊ शकतो. उद्दिष्ट गाठता न आल्याने सहकारी आपली खिल्ली उडवतील. ह्या दरम्यान कोणतेही नवीन काम न करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे. आठवड्याच्या मध्यास अचानकपणे आपले कामातील लक्ष दूर होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही त्रास होईल.

मीन

meen

हा आठवडा आपल्यासाठी अनुकूलतेचा आहे. भागीदारी व्यवसायातून फायदा होईल. अचानक धनलाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. व्यापारात विरोधकां पासून सावध राहावे लागेल. ह्या आठवड्यात सरकारी कामे विलंबाने होतील. नोकरी करणाऱ्यांना उत्तरार्धात नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थी संशोधन कार्यात प्रगती करू शकतील. ह्या आठवड्यात आपणास वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगता येईल. वडिलधाऱ्यां कडून काही लाभ होण्याची शक्यता आहे.