About VIP

‘समाजमनाचं प्रतिबिंब वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन सामाजिक, आर्थिक,राजकीय, सांस्कृतिक आणि तांत्रिक अशा बहुविध क्षेत्रांसंबंधी जागरूकता निर्माण करण्याच्या ध्यासाने आम्हीसुरु करत आहोत “VIP NEWS”. ही व्रतस्थ वाटचाल अखंडपणे, अविरत सुरु ठेवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.सर्व क्षेत्रांसंबंधी इत्यंभूत माहिती पुरवण्यासाठी आणि आपल्या जिज्ञासू वृत्तीला खतपाणी घालण्यास आम्ही सर्वतोपरी सज्ज आहोत

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. मात्र तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात वृत्तपत्र ही संकल्पना मूळ धरू लागली. त्याही पुढे जाऊन सध्याच्या  ‘ डिजिटलायझेशन’ च्या  जगात ‘Online News Channel ’ ने आपले पाय घट्ट रोवायला सुरुवात केली. त्याच अनुषंगाने आम्ही या क्षेत्रात पदार्पण करत आहोत. तंत्रज्ञानाचा यथोचित वापर, आपल्या भोवताली घडणाऱ्या गोष्टींबाबतची सजगता आणि ती वाचकांपर्यंत पोहोचवण्याची कटिबद्धता या त्रिसूत्रींवर आमची वाटचाल असेल. आर्थिक मोबदला या संकुचित वृत्तीवर आमची कार्यपद्धती अवलंबून नाही आणि ती कधीच नसेल याची ग्वाही आम्ही देतो.जबाबदार नागरिकांना पारदर्शकता & अचूकता हे कटाक्ष पाळून योग्य ती माहिती पुरविणे आणि त्यांच्या अपेक्षांना खरे उतरणे यातच आम्ही धन्यता मानतो.

“VIP NEWS” आपल्यासाठी अशा स्वरूपाचं व्यासपीठ उपलब्ध करत आहे जे की तुम्हांस हर प्रकारची माहिती देऊन, सजग ठेऊन बहुआयामी विचार करण्यास प्रवृत्त करेल यात तीळमात्रही शंका नाही. हरघडी बदलणाऱ्या या धावपळीच्या, धकाधकीच्या जगात सूचकता प्रदान करून समाजमनाचा आरसा होऊन, आपल्या सेवेस्तव तत्पर राहणं हे सामाजिक उत्तरदायित्वाचं ऋण फेडण्यात आमचा खारीचा वाटाच असं आम्हांस वाटतं. वाचकांशी एकनिष्ठता हीच आमच्या  तात्विक विचारसरणीची बैठक आहे. हीच कार्यपद्धती आम्ही इथून पुढे अनुसरू निर्लोभ वृत्तीने जोपासू यात जराही शंका नसावी. आमची वाटचाल यशस्वीरीत्या होण्यात आपले आशीर्वाद आणि सहकार्य मोलाची भर घालतील आणि आम्ही त्याचे ऋणी राहू याची आम्हाला खात्री आहे.