आ तानाजी सावंतांच्या जागी शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आमदार ..

0

यवतमाळ विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपाला चारीमुंडया चित केले आहे.

यवतमाळ विधानपरिदषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवलेले महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा विजय झाला आहे..

यवतमाळ विधान परिषदेसाठी भाजपकडुन सुमित बाजोरिया निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते मात्र शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांनी बाजोरिया यांचा पराभव केला आहे ..

दुष्यंत चतुर्वेदी यांना पहिल्याच फेरीत 298 मते मिळाले.. भाजपच्या समित बाजोरिया यांना पहिल्या फेरीत 185 मतं मिळाली होती तर 6 मतं बाद ठरली होती. दुष्यंत चतुर्वेदींचा विजय निश्चित होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करयला सुरूवात केली.

यवतमाळ विधानपरिषदेचे आमदार तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांची ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे 31 जानेवारी रोजी आमदार तानाजी सावंत यांच्या जागी मतदान घेण्यात आले होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडीचं पारडं आधीपासूनच जड मानलं जात होतं..

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा