आम्ही गुजरात मधे आमच्या बापचा शोध घेत नाही, महाराष्ट्र आमच्या बापाचाच –जितेंद्र आव्हाड

0

माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे ..

सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेत असताना CAA संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले हा कायदा आम्ही महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाहीत..

यालाच प्रतिउत्तर देत असताना शेलार यांची जिभ घसरली आहे. हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का?, अश्या खालच्या पातळीवर टिका आशिष शेलारांनी केली आहे..

शेलार यांनी केलेल्या टीकेचा राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेत नाही,तर महाराष्ट्र हा आमच्याच बापाचा आहे असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आशिष शेलार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

जितेंद्र आव्हाड मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत असताना म्हणाले आशिष शेलारांना अशी वक्तव्य करणं शोभत नाही. हातात सत्ता नाही म्हणून भाजप नेते अस्वस्थ आहेत, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी आशिष शेलारांना लगावला आहे..

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा