उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदावरुन माघार,तर यांच्या नावाची चर्चा होणार मुख्यमंत्री.

0

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकासआघाडीचं सरकार महाराष्ट्रात लवकरच स्थापन होईल अस चित्र सध्या महाराष्ट्रात आहे..,

या महाविकास आघाडीतील मंत्रिपदांच्या वाटपाचा फॉर्म्युला आज निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.. मुख्यमंत्रिपद पाच वर्षं शिवसेनेलाच दिलं जाईल, असं राष्ट्रवादी आणी कॉंग्रेस कडुन सांगितले जात आहे. मात्र मुख्यमंत्रीपदी कोण असाव याच्यावरुन आणखी ही संब्रम अवस्था आहे…

दरम्यान शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांचे नाव आघाडीवर होते मात्र आज स्वता उद्धव ठाकरे यांनी आपले नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून काढले आहे… शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा आणि त्यांना दिलेल्या वचनानुसार स्वतः उद्धवसाहेबांनी या चर्चेतून आपलं नाव काढून घेतल्याचं समजत आहे…

दरम्यान मुख्यमंत्रिपदासाठी आता शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे ,खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे,सुभाष देसाई यांची नावे चर्चेत आहेत…

महाराष्ट्रात शिवसेनेसोबत जाण्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं काल एकमत झालं. या दोन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी किमान समान कार्यक्रम आणि सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. तो आज शिवसेनेपुढे ठेवून त्याला अंतिम स्वरूप दिलं जाणार असल्याचं समजतं. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक मातोश्रीवर झाली. त्यावेळी सर्वच्या सर्व ५६ आमदारांनी उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली. परंतु, ‘उद्धवसाहेब’ मुख्यमंत्री होण्याबाबत फारसे सकारात्मक नाहीत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा