हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची प्रतीक्षाच…

0

पुणे :- हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची प्रतीक्षाच…

 राष्ट्रवादीने माझा उपयोग करून घेतला. मला फसवलं गेलं. अपमान केला गेला. यापुढे माझा आक्रमकपणा बघाल, अशा शब्दांत काॅंग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.

आपण आता पुढं काय करायचं, असं हर्षवर्धन पाटील  यांनी जमलेल्या लोकांना विचारल्यानंतर `भाजप`, असे उत्तर आले. पाटील म्हणाले लोकांच्या मनात आहे, तेच होईल काळजी करू नका.

पाटील यांनी अप्रत्यक्ष भाजप प्रवेशाची घोषणाच केली असल्याची सध्या चर्चा आहे.

Harshavardhan Patil in Pune

तुमच्या भावनेचा शंभर टक्के आदर करू, असे त्यांनी सांगितले. स्वतः भाजप प्रवेशाची अधिकृत प्रवेशाची घोषणा करण्याचे त्यांनी टाळले. पण राष्ट्रवादीवर तोंड्सुख घेतले आहे.

पाटील म्हणाले  लोकसभेसाठी मला भाजपने आग्रह केला होता. परंतु मी राष्ट्रवादीला साथ दिली. राज्यात देशात सध्या काय हवा चाललीय हे  वेगळं सांगायला नको. असे सांगत पाटील यांनी भाजप प्रवेशावर एक सुचक विधाण केले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा