देशाचे हित माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग यांचा सल्ला ऐकण्यातच–‘शिवसेना

0

मुंबई :- देशाचे हित माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग यांचा सल्ला ऐकण्यातच–‘शिवसेना

सध्या देशात आर्थिक मंदीची लाट आहे मात्र सरकार कडून अद्याप ही सत्यता स्वीकारली जात नाही परंतु, आर्थिक मंदीबाबत कितीही उलटसुलट सांगितलं, तरी कोंबडा आरवला आहे आणि मौनीबाबा डॉ. मनमोहन सिंग यांनी सौम्य शब्दात सांगितलेल्या सत्याचा स्फोट झाला आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घेण्यातच देशाचं हित आहे..असा सल्ला शिवसेनेने आज ‘सामना’च्या अग्रलेखातून सरकारला दिला आहे…

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सध्याची आर्थीक परिस्थिती खालावल्याणे निशाणा साधला होता…. शिवसेनेने त्यांचे समर्थन करत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे….

आर्थिक मंदीचं राजकारण करु नये आणि तज्ज्ञांच्या मदतीने देश सावरावा, असं आवाहन मनमोहन सिंग या शहाण्या माणसाने केलं आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घ्या, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे……

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा