उस्मानाबाद कॉंग्रेस खिळखिळी..जिल्हाध्यक्षासह तालुका अध्यक्ष शिवसेनेत दाखल….

0

टीम VIP:- उस्मानाबाद कॉंग्रेस खिळखिळी..जिल्हाध्यक्षासह तालुका अध्यक्ष शिवसेनेत दाखल….

उस्मानाबाद जिल्ह्यात काँग्रेसची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत चेडे यांच्यासह तीन तालुकाध्यक्ष आजी-माजी पदाधिकारी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे…

एकेकाळी जिल्ह्यात काँग्रेस सत्तेत होती परंतु बदलत्या राजकीय समिकरना नुसार आज ती पूर्णता खीळखिळी झाली आहे …जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना उपनेते तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत चेडे,आण्णासाहेब देशमुख, विजयसिंह थोरात यांच्यासह ईतर परंडा विधानसभा क्षेत्रांतिल पदाधिकारी यांनी आज मातोश्रीवर उद्दव ठाकरे यांच्याकडून शिवबंधंन बांधले..

परंडा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीला एकाकी पाडण्यासाठी आणि आमदार राहुल मोटे यांच्या पराभवासाठी तानाजी सावंत यांचा हा राजकीय डाव असल्याची चर्चा सध्या मतदार संघात जोरदार आहे ….

परंडा विधानसभा क्षेत्रातिल कॉंग्रेस चे सर्वच बडे नेते शिवसेनेच्या गोटात दाखल झाले आहेत..आ.राहुल मोठे यांच्या विरोधात ही सर्व मंडळीने एकवटली आहे असे चित्र सध्या मतदारसंघात आहे…

दरम्यान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल मोटे यांच्यासमोर शिवसेनेचे तगडे आव्हान असणार याच्यात तिळमात्रही शंका नाही…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा