पुण्यात 25 हजार महिलांचा श्रीमंत दगडुशेट गणपती समोर ‘मोरया’ चा गजर….

0

पुणे :- पुण्यात 25 हजार महिलांचा श्रीमंत दगडुशेट गणपती समोर ‘मोरया’ चा गजर….

मोरया, मोरया’च्या जयघोषाने तब्बल २५ हजारहून अधिक महिलांनी पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या समोर एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून स्त्री शक्तीचा जागर केला…

आज पहाटे पाच वाजल्यापासून महिलांनी या अथर्वशिर्ष उपक्रमाला ऊपस्थीती लावण्यास सुरवात केली होती.. गणरायाच्या नामाचा जयघोष करत ‘मोरया ,मोरया ‘ चा गजर करत  ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळा  उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडला.. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली होती…

अथर्वशिर्ष  उपक्रमाचे यंदाचे ३३ वे वर्ष होते.. ३३ वर्षांपूर्वी 101 महिलांपासून  सुरू झालेला हा उपक्रम  आज  33 व्या वर्षात पदार्पण करत असताना  25 हजार  महिलांपर्यंत पोहोचला आहे …
महिलांचाही गणेशोत्सवात सहभाग असावा याकरीता हा उपक्रम सुरु करण्यात आला होता…..


- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा