“मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही”-अमोल कोल्हे

0

टीम VIP– “मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही” अमोल कोल्हे यांची उदयनराजेंच्या भेटीनंतर प्रतिक्रीया…

खासदार  अमोल कोल्हे उदयनराजे यांच्या भेटीसाठी  आल्यानंतर ते त्यांच्या मनधरणीसाठी आले आहेत अशी चर्चा सुरु झाली होती….

हि चर्चा खरी ठरली आहे ,कारण खासदार अमोल कोल्हे आणि छत्रपती उदयनराजे यांच्यात बंद दाराआड तब्बल पाऊन तास चर्चा झाली आहे…

उदयनराजे भोसले हे भाजपाच्या वाटेवर आहेत ही चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही याचे स्पष्ट संकेत दिले होते… “उदयनराजे भोसले भाजपात येतील, असे ते म्हणाले होते प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राजेंच्या प्रवेश घेऊ चंद्रकांत पाटील म्हणाले होते….

परंतु भाजपात जायचं की नाही हे माझं मी ठरवेन अशीही प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली होती…. सद्यस्थितीत उदयनराजे नेमका भाजपमध्ये प्रवेश करणार की नाही हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही…

म्हणूनच राष्ट्रवादीच्या बाजूने खासदार अमोल कोल्हे यांनी  छत्रपती उदयनराजे  यांचे मन वळवण्यासाठी भेट घेतल्याची उघड झाले आहे ….

मात्र या भेटीनंतर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे “मावळा छत्रपतींच मन वळवू शकत नाही” .. यानंतर उदयनराजे काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे…….

https://youtu.be/MBuIeNY6SiM

https://youtu.be/MBuIeNY6SiM
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा