काँग्रेस की राष्ट्रवादी नारायण राणे यांनी घेतला चिठ्ठीवर निर्णय– शरद पवार..

0

मुंबई : काँग्रेस की राष्ट्रवादी नारायण राणे यांनी घेतला चिठ्ठीवर निर्णय– शरद पवार..

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या  “झंजावात” या पुस्तकाचे आज प्रकाशन होते त्या कार्यक्रमाला उपस्थित शरद पवार ,केंद्रीय मंत्री नितिन गडकरी,विनोद तावडे ,अशिष शेलार , सुनील तटकरे यांच्यासह दिग्गज उपस्थित होते…

प्रकाशन सोहळ्या दरम्यान शरद पवार बोलताना म्हणाले की-
शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंच्या समोर पक्षांतरासाठी दोन पर्याय होते. एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि दुसरा राष्ट्रीय काँग्रेस. अशावेळी संभ्रम निर्माण झाल्यावर त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा दोन चिठ्ठ्या तयार केल्या, त्यातून जी उचलली त्यावर काँग्रेस लिहले होते म्हणून ते काँग्रेसमध्ये गेले. त्यावेळी त्यांनी चूक केली की घोडचूक हे याबाबत आजही काही कळत नाही, असे मत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले…

दरम्यान नारायण राणे यांनी शिवसेना का सोडली याचे कारण त्यांनी सांगितले.. राणे हे शांत संयमी आणि अभ्यासू नेतृत्व आहेत .. कोकणासह महाराष्ट्राच्या विकासात राणेंचे खूप मोठे योगदान आहे असेही पवार म्हणाले….

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा