अनिल अंबानींच्या कंपनीने नोंदवला चौपट नफा

0

मुंबई: अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटलला जूनअखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीत दणदणीत नफा झाला आहे. कंपनीच्या नफ्यात चौपटीने वाढ होत 1,218 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत रिलायन्स कॅपिटलला 295 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचे एकूण उत्पन्न 31 टक्क्यांनी वाढून 4,641 कोटी रुपयांनी वरून 6,083 कोटी रुपयांवर पोचले आहे. 30 जून 2019 अखेर कंपनीची एकूण मालमत्ता 79, 207 कोटी रुपये इतकी आहे. वर्षभरापूर्वी कंपनीची मालमत्ता 83,973 कोटी रुपये इतकी होती. 

दरम्यान या कालावधीत रिलायन्स कॅपिटलने नागरिकांकडून कोणत्याही प्रकारच्या मुदतठेवी स्वीकारलेल्या नाहीत. कंपनीला मागील संपूर्ण आर्थिक वर्षात 1,454 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. रिलायन्स कॅपिटल ही कंपनी अॅसेट मॅनेजमेंट, म्युच्युअल फंड, पेन्शन फंड, इन्श्युरन्स, फायनान्स, स्टॉक ब्रोकिंग, वित्तीय वितरण, गुंतवणूक आणि इतर वित्तीय सेवांच्या क्षेत्रात काम करते. 31 मार्च 2019 अखेर रिलायन्स कॅपिटलवर एकूण 46,400 कोटी रुपयांचे कर्ज होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा