निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे जाहीर सभांचे आयोजन ठिकाणी होत आहे आरोप-प्रत्यारोप होत आहेत अशातच सोलापुरात एका सभेत बोलताना माजी आमदाराची जीभ घसरली असुन त्यांनी भर सभेत आमदार प्रनिती शिंदे यांना धमकी दिली आहे…

सोलापूर मध्य शहर मतदारसंघातुन प्रणिती शिंदे निवडणूक लढवत आहेत. यांच्याविरोधात  समाजवादी नेते  माजी आमदार नरसय्या आडम निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.. आडम मास्तर म्हणून ओळखले जाणारे नरसय्या आडम यांचा एका सभेदरम्यान तोल सुटला आणी त्यांची जीभ घसरली आहे.

आडम यांनी एका सभेदरम्यान प्रणिती शिंदे यांना थेट धमकीच दिली. ‘तुझ्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय आडम मास्तर शांत बसणार नाही. ज्याच्यात पंतप्रधानाला सोलापूरामध्ये आणण्याची ताकद आहे..तो कोणालाही तुरुंगामध्ये घालू शकतो,’ असं माजी आमदार आडम आपल्या भाषणात म्हणाले आहेत .. तसेच पुढे बोलताना त्यांनी आपल्यावर १७० प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल असून हा आकडा २०० झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असंही सांगितलं. ‘हे गुन्हे म्हणजे माझ्यासाठी अलंकार आहेत,’ असे वक्तव्यही आडम यांनी केले आहे.. दरम्यान आडम यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा