पुण्यात पालीका प्राशसनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका आता वाहतूक पोलिसांना बसला आहे .वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच आज ड्रेनेज  देखील साफ कराव लागले आहे..

सिंहगड रोडवर खूप मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाल्याने वाहतूक पोलीस राजाराम ब्रिज वर नेमकी काय अडचण झाली आहे हे पाहण्यासाठी आले असता रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने ,7 त्यांनी पालिका प्रशासनाला माहिती दिली ड्रेनेज जाम झाल्याने पाणी रस्त्यावर साचले आहे आणि त्याचा फटका वाहतुकीला बसत असल्याचे सांगितले , मात्र पालीका प्रशासनाकडुन कोणत्याही पद्धतीची मदत झाली नाही.

पालिका प्रशासन मदत करत नसल्याचे लक्षात आल्याने वाहतूक पोलिसांनी स्वतः ड्रेनेज दुरुस्तीचे काम हाती घेऊन, रस्त्यावर साचलेले  पाणी ड्रेनेज मधे जायला वाट करुन  दिली.
रस्त्यावरील पाणी साचलेले निघुण गेल्याने  राजाराम ब्रिज सिंहगड रोडवरील  ट्रॅफिक सुरळीत करण्यास मदत झाली असल्याचे वाहतुक पोलीसांनी सांगितले….

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा