करमाळा विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवाच्या गोटात खळबळ सुरु आहे.. अजीत पवार यांनी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करु नका तर अपक्ष असलेले संजय मामा शिंदे यांचा प्रचार करा असे सांगितल्याने पक्षाचे अधिकृत असलेले उमेदवार कृष्णाराव पाटील घाटनेकर नाराज असल्याची चर्चा आहे…

घाटनेकर पाटील म्हणाले  “सातत्यानं आम्ही शेतकरी चळवळीत सहभागी होत असतो. म्हणुनच राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला उमेदवारी दिली आहे. परंतु  अजित पवार यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांचं ते वक्तव्य दुर्देवी आहे. त्याचा आमच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही,” असं घाटणेकर म्हनाले ….

पूढे बोलत असतात घाटनेकर पाटील म्हणाले  “आम्ही शेतकरी चळवळीतली माणसं आहोत. अजित पवार यांनी आम्हाला पाठिंबा दिला किंवा नाही दिला त्याने  आमच्यावर कसलाही  फरक पडणार नाही.. पयेनारया विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना सोबत घेऊन करमाळा मतदारसंघात आम्ही ही लढाई लढनार आहोत शिवाय ती  जिंकून देखील दाखवू,” असे पाटील म्हनाले..

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय कृष्णराव पाटील घाटनेकर  यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यानंतर त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश पक्षाच्यावतीने देण्यात आला होता. मात्र तांत्रिक अडचणींमुळे अर्ज माघे घेता न आल्याने तो तसाच राहीला… परंतु अपक्ष उमेदवार असलेले संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे….

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा