भारतीय वायुसेनेला आपले पहिले राफेल फायटर विमान मिळाले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वत: फ्रान्स ला जाऊन हे विमान आज दसरयाचे पूजन करुन आपल्या ताब्यात घेतले आहे…

राजनाथ सिंग वायुसेनेच्या फायटर प्लेनमधुन  राफेलच्या फॅक्टरीत पोहोचले. फॅक्टरीची पाहणी झाल्यानंतर .. फ्रान्सने औपचारिकरित्या भारताला पहिले फायटर राफेल विमान सोपावले. भारतीय सुरक्षा दलासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. त्याच बरोबर आज दसरा आहे..राफेल विमानांचा व्यापक तपास आणि पायलटच्या ट्रेनिंगमध्ये अधिक वेळ लागत असल्याने, राफेल भारतात आणण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे.

राफेल भारतात मे २०२० पर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राफेल फायटर जेटमुळे, भारतीय हवाई सेनेची ताकत खुप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.. सप्टेंबर २०१६ मध्ये भारत आणि फ्रान्समध्ये ३६ राफेल विमान खरेदी करण्याचा करार झाला होता…..

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा