भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज मुलीच्या प्रचाराचा नारळ फोडून सुरुवात केली यावेळी बोलताना नाथाभाऊ म्हणाले येनारया काळात महाअघाडी सत्तेत येणार असल्याचं सुचक वक्तव्य केले आहे…

यावेळी खासदार रक्षा खडसे, उमेदवार हरिभाऊ जावळे उपस्थित होते. खडसे म्हणाले, बरेच रामायण घडले. महाभारताचाही पहिला अध्यायही आटोपला. मात्र नाथाभाऊ भाजपामध्येच आहे. आता सब मिलके आओ और नाथाभाऊंको गिराओ.. म्हणून आघाड्या बिघाड्या सुरू आहेत. अरे हा नाथाभाऊ अभिमन्यू नाही, तर अर्जुन आहे. रणांगणातून बाहेर निघणं चांगले जाणतो. तो कधी अडकणार नाही. मिल गया तो मिल गया नही तो छोड दिया… तीर लगा तो ठीक है.. नही तो कमान अपने पास है..असा टोला लावत विरोधकांचा चांगलाच समाचार देखील घेतला आहे…,

पूढे बोलत असताना नाथाभाऊ म्हणाले समाजाच्या हितासाठी व कल्याणासाठी मी लढा देत आहे..कोणत्याही एका समाजाच्या नेतृत्वासाठी आपण लढत नसल्याच त्यांनी सांगितले . आदिवासी, दलित अल्पसंख्याक, बहुजन, तळागाळातील शेवटच्या घटकातील दीनदुबळ्यांसाठी पोटच्या मुलासारखी आम्ही सेवा केली आहे. म्हणून आम्हाला आपल्याकडे हक्काचे मतदान मागण्याचा अधिकार आहे. आणि तो तुम्ही आम्हाला हक्काने देणारच असा विश्वास यावेळी एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला….

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा