परंडा विधानसभा मतदारसंघात एकुण 15 उमेदवारी अर्ज क वैद्य ठरले होते. त्याच्यातील 5 उमेदवारांने आज शेवटच्या दिवशी माघार घेतल्याने 10 उमेदवार निवडणुकिच्या रिंगणात आहेत…..

परंडा विधानसभा निवडणुक यंदा चुरशीची होणार असून. या निवडणुकीत मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केलेले राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोठे शिवसेनेचे उपनेते तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले तानाजी सावंत.. जय हनुमान संघटनेचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश भाऊ कांबळे हे  एकमेकांच्या विरोधात नशीब आजमावत आहेत..

मतदारसंघात सध्या चर्चा सुरू आहे ती या तीनच लोकांची. राहुल मोठे आपल्या विजयाचा चौकार मारण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत., परंतु  यावेळी आमदार राहुल मोठे यांचा चौकार आडवण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार तानाजी सावंत यांनी पूर्ण ताकतीने फ़ील्डिंग लावलेले आहे. ज्या ठिकाणाहून चौकार जाऊ शकतो वाटत होते त्याठिकाणी त्यांनी डबल फिल्डर लावल्याची चर्चा मतदारसंघात जोरात सुरू आहे….

मात्र आमदार राहुल मोटे आणि तानाजी सावंत यांना अडवण्यासाठी जय हनुमान संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलेले सुरेश भाऊ कांबळे सर्व तयारी करून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत..

आजच्या घडीला मतदारसंघात कोण बाजी मारेल हे सांगणे खूप कठीण आहे .आमदार मोठे आणि आमदार सावंत या दोघांच्या लढाईत सुरेश भाऊ मैदान मारणार का ???. किवा सुरेश भाऊंच्या मदतीने आमदार राहुल मोटे यांच्या चौकर सोयीस्कर होणार ..की आमदार तानाजी सावंत कॉंग्रेस नेत्यांच्या मदतीने चौकार अडवनार  हे पाहणं औस्तुक्याचे ठरणार आहे…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा