भारतिय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत दादा पाटील कोथरूड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहे त्यांना बाहेरचा उमेदवार म्हणून ब्राह्मण महासंघ विरोध दर्शवला होता..

कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील निवडणूक लढवत आहेत. त्याच अनुषंगाने नाराज असलेले मेधा कुलकर्णी कामाला लागतात की नाही तोपर्यंत ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत दादा पाटील यांना विरोध दर्शवला होता .. चंद्रकांत दादा  यांच्याविरोधात आपला उमेदवार उभा केला होता मात्र आज ब्राह्मण महासंघ आणि चंद्रकांत पाटील यांच्यात झालेल्या बैठकीत ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत दादा यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे…

दरम्यान कोथरूड ची प्रामुख्याने लढत चंद्रकांत दादा पाटील आणी मणसे चे  किशोर शिंदे यांच्यातच होणार आहे. मनसेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पाठिंबा दिल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे..

दरम्यान चंद्रकांत दादा पाटिल यांना विरोध करणाऱ्या ब्राह्मण महासंघाने पाठिंबा दर्शवल्याने  चंद्रकांत दादा यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय सोयीस्कर झाल्याची चर्चा मतदार संघात रंगू लागली आहे….

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा