उस्मानाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री तानाजी सावंत यांनी परंडा विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज आज प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन व रॅली काढून दाखल केला आहे

पालकमंत्री तानाजी सावंत यांनी भूम-परंडा-वाशी मतदार संघात मागील दोन वर्षापासून मोर्चेबांधणीला सुरवात केलेली होती . सावंत यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे कामे त्याचबरोबर ईतर विकासाचे कामे केले असल्याने लोकांचा त्यांना पाठिंबा आहे..

तानाजी सावंत यांनी मतदारसंघातिल काँग्रेसचे सर्वच मातब्बर नेते  शिवसेनेत समाविष्ट करुन घेतल्याने शिवसेनेची ताकत वाढली आहे…

पालक मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात असलेले  राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन टर्म चे आमदार राहुल मोठे यांचे तानाजी सावंत यांना आव्हान असनार आहे..त्याचबरोबर शिवसेनेतून बंड करुन बाहेर पडलेले सुरेश कांबळे यांचे देखील सावंत यांच्या समोर कडवे आव्हान असनार आहे….

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा