शिवसेनेत बंड पुकारून तडकाफडकी आपल्या सदस्यत्वाचा आणि तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देत सुरेश भाऊ कांबळे यांनी वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी मिळवत आज परंडा विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे..

सुरेश कांबळे जय हनुमान संघटनेचे अध्यक्ष आहेत मागील तीन-चार वर्षात शिवसेना वाढीसाठी त्यांनी खूप संघर्ष केला होता खेडोपाडी शाखा  स्थापण केल्या होत्या..मतदारसंघात पक्षाच्या पडत्या काळात शिवसेनेला सावरायचे काम सुरेश भाऊ कांबळे यांनी केले होते. मात्र विधासभेची उमेदवारी न भेटल्याने सुरेश कांबळे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारत वंचित बहुजन आघाडी कडुन आज आर्ज दाखल केला आहे….

दरम्यान सुरेश भाऊ कांबळे यांना पोलीसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडु नये यासाठी शक्तीप्रदर्शन व रॅली ला परवानगी नाकारली होती. तरीदेखील आज भुम येथे अर्ज भरन्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.. यावेळी सुरेश भाऊ यांनी सर्व कार्यकर्त्यांचे मतदारांचे आभार मानले आहेत….

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा