धनेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उस्मानाबाद भाजपचे नेते प्रतापसिंह पाटील त्यांनी आज भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

प्रतापसिंह पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केला होता ..पाटील लोकसभेला निवडणूक लढविण्यास इच्छुक होते मात्र युती झाल्याने मतदारसंघ वाटाघाटीत शिवसेनेला राखीव असल्याने त्यावेळी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती..मात्र त्यांनी विधानसभेची मोर्चे बांधणीला सुरुवात केली होती परंतु विधानसभेलाही भाजपकडून भ्रमनिरास झाल्याने त्यांनी राष्ट्रवादीत जाणे पसंत केले आहे..

पाटील यांचा पुर्ण जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे युवकांचे संघटन देखील खुप मोठ्या प्रमाणात आहे.. उस्मानाबद /कळंब मतदारसंघातिल  राणा पाटील राष्ट्रवादीला सोडुन भाजपात गेल्याने व राष्ट्रवादीला देखील तगडा उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने प्रतापसिंह पाटील यांना विचारणा केली असून उस्मानाबाद कळंब मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय झाला असल्याने पाटिल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा