उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहुल मोटे यांनी आज राष्ट्रवादीचे अद्य्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करून त्याचबरोबर शहरातून रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे

परंडा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो गेली 15 वर्ष मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे .आमदार राहुल मोटे यांनी पंधरा वर्ष मतदारसंघात आपलं वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राष्ट्रवादी पक्षाने पुन्हा चौथ्यांदा राहुल मोठे यांना उमेदवारी देऊन बालेकिल्ला अभेद ठेवण्यासाठी तयारीला लावले आहे….

राष्ट्रवादीच्या आमदार राहुल मोठे यांना जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांचे शिवसेनेकडून आव्हान असणार आहे. शिवसेनेचे तानाजी सावंत हे परंडा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत त्यांना काही शिवसैनिकांचं विरोध केला आहे मात्र थेट राहुल मोठे आणि तानाजी सावंत यांच्यात होणार असून त्याचे परिणाम काय होतात येणाऱ्या काही दिवसातच कळेल..

दरम्यान राहुल मोठे यांनी शक्तीप्रदर्शन करत रॅली काढून विरोधकांना राष्ट्रवादीची ताकद दाखवून दिलेली आहे. शिवाय हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे आणि यावेळी चौकार मारणारच आणि बाहेरून आलेले हे पार्सल सीमारेषेच्या बाहेर लावणार म्हणजे लावणार असा विश्वास देखील आमदार राहुल मोटे यांनी व्यक्त केला आहे…..

आमदार राहुल मोठे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख महिला युतीच्या अध्यक्ष सक्षणा सलगर त्याचबरोबर मतदारसंघातील नेते आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते..

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा