शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत ठाकरे कुटुंबातील व्यक्तीने निवडणूक लढवली नाही .सत्तेच्या सर्व चाव्या हातात असताना देखील कधीच सत्तेच्या खुर्चीवर बसले नाही. मात्र ठाकरे घराण्याने रिमोट कंट्रोल आजपर्यंत सरकार चालवली आदेश देऊन काम करुण घ्यायचे शिवसेनेचा आजपर्यंतचा इतिहास होता…मात्र याला अपवाद ठरले आहेत ते आदित्य ठाकरे आदित्य आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत….

शिवसेनेत आता आदित्य पर्वाला सुरुवात झाली आहे आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेनंतर ते  निवडणूक ग्रामीण महाराष्ट्रातून लढणार की शहरी भागातून हा सगळ्यात मोठा त्यांच्या समोरचा पेच होता. मात्र आदीत्य  यांनी वरळी विधानसभा लढवन्याचा निर्णय घेतला आहे.. त्यांनी तशी आज अधिकृतरीत्या वरळी  येथील संकल्प मेळाव्यात घोषणाही केली…..

दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या रूपाने महाराष्ट्राला पुन्हा एक युवा नेता मिळणार आहे.. वरळी येथील युवा सैनिकात आणि शिवसेनेत  आदित्य यांच्या नावाची घोषणा होताच आनंदाचे वातावरण आहे…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा